खासदारांच्या स्थानिक विकास निधीची कार्यकक्षा वाढवण्यात आली आहे. आता या निधीतून शाळांसाठी फर्निचर आणि सहकारी सोसायटय़ांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करता येणार आहे. यापूर्वी खासदार स्थानिक विकास निधीतून शाळा, नोंदणीकृत न्यास आणि सहकारी संस्थांना फर्निचर खरेदीची शिफारस करता येत होती.  शाळांची गरज लक्षात घेता माध्यमिक स्तरापर्यंत काही अटींवर आणि त्याची कार्यकक्षा वाढवण्यात येणार आहे. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खासदार निधीतून फर्निचर, सरकारी मान्यताप्राप्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसाठी साहित्य खरेदी करता येईल. एखाद्या शाळेला ५० लाख रुपयांपर्यंत खरेदी खासदार सुचवू शकतील. सहकारी संस्थांसाठी  ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून अस्तित्वात हवी. तिचा नावलौकिक हवा,  जिल्हास्तरीय लेखापरीक्षणात या संस्थेबाबत अनुकूल मत व्यक्त व्हायला हवे.