वैज्ञानिक आता यंत्रमानवांना विचार करता यावा यासाठी प्रोग्रॅमिंग म्हणजे आज्ञावली तयार करीत असून, त्यामुळे ते निर्णय घेण्यात माणसासारखे हुशार बनू शकतील. यंत्रमानवांना अधिक न्यूरॉटिक करण्याची ही प्रक्रिया आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील आकलन विज्ञानाचे प्राध्यापक जेफ क्रिचमार यांनी सांगितले, की न्यूरॉटिक यंत्रमानव तयार करण्याचे प्रयोग चालू असून यात यंत्रमानव मोकळय़ा जागांना घाबरतात, त्यांच्यात ऑबसेसिव्ह कपलसिव्ह डिसऑर्डर हा लक्षणसमूहही आढळतो.
यंत्रमानवांना पिंजऱ्यातील उंदराप्रमाणे बनवण्याचा हेतू आहे. त्यांच्या मते यंत्रमानवाचा मेंदू हा मानवी मेंदूसारखाच असेल व त्यात अधिक लवचिकता व परिस्थितीशी जुळते घेण्याची ताकद असेल. जैविक यंत्रणेपेक्षा कुठलीही यांत्रिक व्यवस्था फार कणखर नसते. जर आपण उंदीर किंवा घूस एखाद्या खोलीत ठेवली तर तेथील वातावरण तिला अपरिचित असेल त्यामुळे ते उंदीर भिंतींना धडका देत बसेल. नंतर हळूहळू उंदीर त्याला परिचित होईल व तो खोलीत चालू लागेल. योग्य वाटू लागेल तोपर्यंत तो वाट पाहील, परंतु तो त्या खोलीतून बाहेर पडण्यात फारसा उत्सुक असणार नाही. क्रिचमार यांच्या पथकाने उंदराचे हे प्रारूप वापरून तसेच डोपॅमाईन व सेरोटोनिन ही मेंदूतील दोन संप्रेरके वापरून आनंद देणारी केंद्रे व सुखाचा अनुभव देणारी केंद्रे यांची क्षमता बदलण्यात यश आले असे डिस्कव्हरी न्यूजने म्हटले आहे. उंदरांवर रसायनांचे परिणाम दिसले. ते आज्ञावलीच्या मदतीने घडवून आणता येतील असे क्रिचमार यांनी सांगितले. मानवाच्या गरजा पूर्ण करणारा रोबो भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा आहे.

रोबो निर्णयक्षम
बोधन प्रणाली व मेंदूची यंत्रणा यांची गणितीय प्रारूपे आम्ही तयार केली आहेत ती सॉफ्टवेअरमध्ये वापरली जातील व ती यंत्रमानवाचा मेंदू नियंत्रित करतील. यंत्रमानवाने भीती प्रदर्शित करणे, चांगले निर्णय घेताना काळजी घेणे, शोध व सुटका, खराब हवामानापासून बचाव या माणूस करतो त्या गोष्टी यंत्रमानवास शिकवता येतील. आयइइइ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या हाँगकाँगमधील परिषदेत याबाबतचे संशोधन सादर करण्यात आले.