अमेरिकेच्या एका विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या चमूने जगातील सर्वात पांढरा रंग तयार केला आहे, जो ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धच्या लढ्याला मदत करू शकतो. आतापर्यंतचा सर्वाधिक पांढरा रंग म्हणून या रंगाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये प्रवेश केला आहे. पर्ड्यू विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक झ्युलीन रुआन आणि त्यांच्या टीमने हा रंग विकसित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या रंगामुळे ९८.१ टक्के सूर्यप्रकाश परावर्तित होतो आणि इन्फ्रारेड उष्णता परावर्तित होते, ज्यामुळे इमारतींच्या सभोवतालच्या हवेचे तापमान थंड होऊ शकते. याचा अर्थ ते एअर कंडिशनरचा वापर कमी करू शकते. नवीन पेंट सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेपेक्षा कमी उष्णता शोषून घेतो. व्यावसायिक पांढरा रंग साधारणपणे केवळ ८० ते ९० टक्के सूर्यप्रकाश परावर्तित करतो.


“सामान्य व्यावसायिक पांढरा रंग थंड होण्याऐवजी उबदार होतो. उष्णता नाकारण्यासाठी तयार केलेले बाजारातील रंग केवळ ८० ते ९० टक्के सूर्यप्रकाश परावर्तित करतात आणि पृष्ठभागाला त्यांच्या सभोवतालपेक्षा थंड करू शकत नाहीत,” पर्ड्यू विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले आहे.

सुमारे एक हजार चौरस फूट छप्पर क्षेत्र झाकण्यासाठी हा रंग वापरल्याने १० किलोवॅटची शीतकरण शक्ती निर्माण होऊ शकते, असे पर्ड्यू विद्यापीठातल्या संशोधकांनी सांगितले. रुआन यांच्या मते, बहुतेक घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एअर कंडिशनर्सपेक्षा हे अधिक शक्तिशाली आहे. “जेव्हा आम्ही सुमारे सात वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरू केला होता, तेव्हा आम्ही ऊर्जा वाचवत होतो आणि हवामान बदलाशी लढा देत होतो,” असं रुआन हे “द इज पर्ड्यू” च्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scientists create worlds whitest paint that could reduce need for air conditioning vsk
First published on: 18-09-2021 at 19:24 IST