योगायोगाने लागलेल्या शोधात वैज्ञानिकांना एका द्वैतारकीय प्रणालीत उलटा ग्रह सापडला असून तो पृथ्वीपासून २६०० प्रकाशवर्षे अंतरावर दूर आहे.  विशेष म्हणजे यातील द्वितारकीय प्रणाली ही अशी आहे की, निकटच्या ताऱ्याचे वस्तुमान त्याचा सहचर ताऱ्याचा प्रकाश किती प्रमाणात विस्तारतो याच्या मदतीने मोजता येते, याला सेल्फ लेन्सिंग तंत्र (स्वभिंग तंत्र)असे म्हटले जाते.
वॉशिंग्टन विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ एरिक अगोल व डॉक्टरेटचे विद्यार्थी एथन क्रूस यांनी सांगितले की, तारकीय उत्क्रांतीबाबत १९७३ मध्ये वैज्ञानिकांनी मांडलेला अंदाज बरोबर ठरला असून अशी तारकीय प्रणाली व त्याभोवतीचा ग्रह अस्तित्वात आहे. काही आश्चर्यकारक शोधांमध्ये या शोधाची गणना होऊ शकते, कारण योगायोगानेच हा शोध लागला आहे.  
केप्लर अवकाश दुर्बिणीने पाठवलेल्या माहितीच्या क्रूस यांनी द्वितारकीय प्रणाली केओआय ३२७८ चा शोध लागला असून त्यात वैशिष्टयपूर्ण काही असेच त्यांना सुरूवातीला वाटले होते, पण नंतर त्यांना त्याभोवती उलटापुलटा ग्रह दिसला तो प्रतियुतीच्या अगदी विरूद्ध स्थिती दर्शवत होता.
अगोल यांनी सांगितले की, यातील कल्पना अगदी साधी असून गुरूत्वामुळे अवकाश व काल वक्र होतात व जेव्हा प्रकाश आपल्या दिशेने प्रवास करतो तेव्हा तो वाकतो. त्यामुळे कोणत्याही वस्तुमानाचा गुरूत्वीय पदार्थ हा गुरूत्वीय भिंगासारखे काम करतो, पण त्यासाठी ते पदार्थ एकमेकांपासून लांब असावे लागतात. यातील गमतीचा भाग असा की, गुरूत्वीय भिंगाच्या परिणामाचा वापर करून आम्ही जवळच्या श्वेतबटू ताऱ्याचे वस्तुमान काढू शकलो, असे अगोल यांनी सांगितले.
गुरूत्वीय भिंग हे खगोलशास्त्रातील एक साधन असून त्यामुळे दूरवरचे तारे जे आपल्या आकाशगंगेत आहेत ते शोधून काढता येतात. अल्बर्ट आइनस्टाइनने त्याच्या ‘जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ म्हणजे सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा पडताळा घेण्यासाठी त्याचाच वापर केला होता. आपल्याच आकाशगंगेत गुरूत्वीय भिंगाचा वापर करून ताऱ्याचे वस्तुमान शोधण्याला ‘मायक्रो लेन्सिंग’ असे म्हणतात.

केओआय ३२७८ ही तारका प्रणाली
केओआय ३२७८ ही तारका प्रणाली ‘स्वरमंडल’ नावाच्या तारकापुंजात आहे. पृथ्वीपासून ती २६०० प्रकाशवर्षे दूर आहे. हे तारे एकमेकांभोवती ८८.१८ दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतात. ते एकमेकांपासून ४३ दशलक्ष मैल अंतरावर असून हे अंतर सूर्य व बुध यांच्यातील अंतराइतके आहे. श्वेतबटू तारा हा शीत तारा असून त्याच्या आयुष्याच्या अंताकडे झुकलेला आहे व तो पृथ्वीच्या आकाराचा असून, त्याचे वस्तुमान दोन लाख पटींनी जास्त आहे. त्यामुळे श्वेतबटू तारा  त्याच्या सहकारी ताऱ्याचा प्रकाश वाकवतो व भिंगाप्रमाणे गुरूत्वीय भिंगाप्रमाणे तो प्रकाश विस्तारतो