लॉस एंजल्स : करोना संसर्गावर उपयोगी ठरू शकेल असे एक नवीन औषध शोधल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. सध्या त्याचा उपयोग हा वेदनाशामक किंवा इतर कारणांसाठी केला जातो. लॉस एंजल्समधील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, ४ फेनिलब्युटिरिक अ‍ॅसिड (४ पीबीए) हे औषध प्राण्यांमध्ये कोविडवर गुणकारी ठरले आहे. हे संशोधन ‘सायटोकिन व ग्रोथ फॅक्टर्स रिव्ह्य़ू’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून कोविड रुग्णात सायटोकिन रेणू जास्त सुटत असतात. शरीराच्या प्रतिरक्षा प्रणालीचा तो एक भाग असतो. या रेणूंच्या जास्त प्रमाणामुळे बहुअवयव विकलांगता येऊन माणूस मरतो. अनेक गंभीर आजारात सायटोकिन रेणूंचे हे वादळ रोखणे गरजेचे असते. जेव्हा पेशी संसर्गाच्या ओझ्याखाली असतात तेव्हा त्यांना सायटोकिन म्हणतात. त्यांच्यावर जास्त ताण आला तर तो त्या पसरवत जातात. त्यामुळे पेशींवरचा ताण कमी करणे हा कोविड १९ रुग्णांसाठी एक उपाय आहे, असे स्पेनमधील मॅलगा विद्यापीठाचे इव्हान डय़ुरॉन यांनी सांगितले की, त्यांच्या मते ४ पीबीए रेणू हे ताण दूर करणारे असतात. प्राथमिक चाचण्यात प्राण्यांमध्ये असे दिसून आले की, ४ पीबीए या औषधाने कोविड १९ रुग्णांच्या मृत्यूची शक्यता कमी होते. कोविड रुग्णांमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रेसिडेंट प्रोटिन  हे पेशींवरचा ताण दाखवणारे रसायन रक्तातील एक निदर्शक खूण म्हणून काम करते.