News Flash

भारत-पाक मतभेदामुळे एससीओच्या ऐक्यावर परिणाम नाही

भारत व पाकिस्तान यांच्या सहभागामुळे गटाच्या ऐक्यात अडथळा येईल

| June 16, 2017 03:45 am

शांघाय सहकार्य संघटनेचे (एससीओ) घोषणापत्र सदस्यांना त्यांचे परस्पर वैर संघटनेत आणण्यास मनाई करीत असल्याने भारत व पाकिस्तान यांच्यातील मतभेदामुळे या गटाच्या ऐक्यावर परिणाम होईल ही शंका फेटाळून लावत चीनने या दोन देशांच्या एससीओतील सहभागाचे स्वागत केले आहे.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा (एससीओ) संस्थापक सदस्य म्हणून भारत व पाकिस्तानच्या सदस्यत्वाबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो, असे या दोन देशांना औपचारिकपणे संघटनेत समावून घेण्यासाठी तिच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चीनचे सहायक परराष्ट्रमंत्री कोंग झुआनयू म्हणाले.

गेल्या ८-९ जूनला कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये झालेल्या एससीओ परिषदेत भारत व पाकिस्तान यांना या गटाचे औपचारिक सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली होती. आता आठ सदस्यांच्या झालेल्या या गटाचे मुख्यालय सध्या गटाचा प्रबळ सदस्य असलेल्या चीनमध्ये आहे. गुरुवारी या ठिकाणी भारत व पाकिस्तान यांचे राष्ट्रध्वज फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारताचे चीनमधील राजदूत विजय गोखले व त्यांचे पाकिस्तानी समपदस्थ मसूद खालिद हे या वेळी हजर होते.

भारत व पाकिस्तान यांच्या सहभागामुळे गटाच्या ऐक्यात अडथळा येईल, ही भीती कोंग यांनी फेटाळून लावली. सदस्यांच्या द्विपक्षीय संबंधातील वैर संघटनेत आणू नये, असे एससीओच्या सनदेतच नमूद आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले आणि दोन्ही देश संघटनेच्या सनदेचे पालन करतील अशी आशा व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 3:45 am

Web Title: sco charter prohibits india pakistan to raise bilateral issues
Next Stories
1 सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश पी एन भगवती यांचे निधन
2 लादेनचे वर्चस्व असलेल्या तोराबोरा पर्वतरांगेवर आयसिसचा कब्जा
3 तेलगू देसमच्या खासदाराची दादागिरी, विमानतळावर कर्मचाऱ्याला धक्काबुक्की
Just Now!
X