News Flash

गुजरातमध्ये काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडले; खा. राजीव सातव यांना अटक आणि सुटका

हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

Gujrat election : राजकोट येथील रेया रोडवरील काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरु यांचे भाऊ दीप राजगुरु यांच्यावर भाजपचे पोस्टर काढण्याच्या वादातून हल्ला झाला होता. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रूपानी यांच्या घराबाहेरचे पोस्टर काढायला सुरूवात केली.

गुजरातच्या राजकोटमध्ये शनिवारी रात्री काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी पोलिसांकडून राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना पोलिसांनी मारहाण करून अटक केली होती. काँग्रेस उमेदवाराच्या भावाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या घराबाहेर काँग्रेसकडून निदर्शने सुरू असताना हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये खासदार राजीव सातव यांचाही समावेश होता. मात्र, लगेचच या सगळ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

प्रचारात शालीनता हवी!

राजकोट येथील रेया रोडवरील काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरु यांचे भाऊ दीप राजगुरु यांच्यावर भाजपचे पोस्टर काढण्याच्या वादातून हल्ला झाला होता. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रूपानी यांच्या घराबाहेरचे पोस्टर काढायला सुरूवात केली. त्यावेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दरम्यान, या घटनेनंतर भाजपने पोलिसी बळाचा वापर करून सातव यांना अटक करायला लावली आणि त्यांना मारहाण करून दहशत निर्माण करायचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

हवा नाराजीची, पण ‘कमळा’चीच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 11:16 am

Web Title: scuffle between bjp and congress workers in rajkot maharashtra rajiv satav arrested
Next Stories
1 पाकिस्तानच्या राजकारणात हाफिज सईदची एन्ट्री; सार्वत्रिक निवडणूक लढवणार
2 प्रचारात शालीनता हवी!
3 रशियाकडून भारतासाठी चार टप्प्यांत हलक्या हेलिकॉप्टरची निर्मिती
Just Now!
X