पृथ्वीवर ६.५ कोटी वर्षांपूर्वी डायनॉसॉरसारख्या प्राण्यांसह जीवसृष्टी नष्ट होऊनही सागरातील काही प्राणी वाचले होते त्याचे कारण उलगडण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. डायनॉसॉर्सप्रमाणेच सागरातील सरीसृप, अपृष्ठवंशीय व सूक्ष्मजीवही नष्ट झाले होते, त्याला कारण एका उल्कापाषाणाचा किंवा लघुग्रहाचा आघात हे मानले जाते त्या वेळी जगातील सागरात मोठे बदल झाले तरी अगदी खोलवर असलेले काही सूक्ष्मजीव मात्र त्यातून वाचले होते ते कसे वाचले असावेत याचे कोडेच आहे. या आघातावेळी सागरातील सजीवांचे मुख्य अन्न असलेले शैवाल व जीवाणू नष्ट झाले होते, असे असले तरी तळाच्या भागात काही सूक्ष्मजीव जिवंत राहिले, याचे कारण शोधण्याचे प्रयत्न अजूनही चालू आहेत. ब्रिटनमधील काíडफ विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे, की सागराच्या वरच्या भागातील शैवाल व जीवाणू नष्ट झाले होते हे खरे असले तरी त्यांचेच काही प्रकार लघुग्रहाच्या किंवा उल्कापाषाणाच्या आघातानंतरही टिकून राहिले होते, त्यामुळे सागरी प्राण्यांना तळाशी असतानाही अन्न मिळत होते. सागरातील काही सजीवांचे जे जीवाश्म आहेत. त्यातील माहितीचे विश्लेषण करून हा उलगडा करण्यात आला आहे. सागरातील वरच्या भागातून अन्न खालच्या भागात जात होते ते सेंद्रिय द्रव्य होते व अगदी कमी प्रमाणात ते उपलब्ध झाल्यामुळे उल्कापाषाणाच्या आघातानंतरही सागरातील काही जीव टिकून राहिले होते. या संशोधनात वैज्ञानिकांनी दक्षिण अटलांटिकच्या तळाकडील भागात खोदकाम करून काही जीवाश्म मिळवले आहेत. आघातानंतर सागरी जीवांची अन्नसाखळी तुटली होती ती पूर्ववत होण्यास नंतर १७ लाख वष्रे लागली. पण आधीच्या अंदाजानुसार अन्नपुरवठा पूर्ववत होण्यास ३४ लाखांहून अधिक वष्रे लागली असे मानले जात होते. डायनॉसॉर्स ज्या आघातात मारले गेले त्यात सागरी परिसंस्थाही नष्ट झाली होती. अनेक सागरी सरीसृप प्राणी त्यांची अन्नाची गरज वेगळय़ा पद्धतीने भागवत होते असे काíडफ विद्यापीठाचे हिथर बीर्च यांनी सांगितले. त्या काळात अचानक आघात होऊन जीवसृष्टी नष्ट झाली. त्यात प्लँक्टन या सागरी वनस्पती नष्ट झाल्या तरी शैवाल व जीवाणू काही प्रमाणात सागराच्या तळाशी टिकून राहिले. त्यामुळे सागरी तळाशी असलेल्या प्राण्यांना अल्पप्रमाणात का होईना अन्नपुरवठा होत राहिला. असे असले तरी सागराच्या तळाशी असलेला अन्नपुरवठा आणखी सुरळीत होण्यास २० लाख वष्रे लागली असे बिर्च यांचे मत आहे. अनेक वैज्ञानिकांच्या मते ६.५ कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या युकाटन भागात ११० किमी व्यासाचा लघुग्रह कोसळला होता. या लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवर सूर्याची ऊर्जा येणे बंद झाले व हरितगृह वायूंनी तापमान वाढत गेले व जीवसृष्टी नष्ट झाली होती. जर्नल इकॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.