22 February 2019

News Flash

Section 377 verdict : ‘अखेर देशाने आम्हाला स्वीकारलं’

हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा क्षण ठरत आहे.

अनेकांनीच या निर्णयाचं मोठ्या मनाने स्वागत केलं

Section 377 verdict. गुरुवारचा दिवस भारतीय कायद्याच्या आणि संविधानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण दिवस ठरला असून, सर्वच स्तरांतून अनेकांनीच या निर्णयाचं मोठ्या मनाने स्वागत केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून्ही अनेकांनीच व्यक्त होत याविषयी त्यांचं मतप्रदर्शन केलं.

एलजीबीटी समुदायातीलच एक सदस्य, मिनाझ याने ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी संवाद साधतेवेळी त्याचा आनंद व्यक्त करत भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार मानले. एक ‘गे’ व्यक्ती म्हणून हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा क्षण ठरत आहे. आपली मातृभूमी समजल्या जाणाऱ्या या देशात अखेर एका नव्या अशा क्रांतिकारी पर्वाची सुरुवात झाली आहे, त्यांनी आमचा स्वीकार केला आहे, असं तो म्हणाला. अखेर न्यायव्यवस्थाही आमच्या बाजूने आहे, हे सिद्ध झालं आहे असं म्हणत आपली ओळख गोपनीय ठेवण्याच्या अटीवर मिनाझने त्याची ही प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला.

वाचा : #Section377 : ‘स्वच्छंदपणे आणि सर्वांसमोर प्रेम करण्याचं स्वातंत्र्य हवंय’

दरम्यान, सोशल मीडियावर सध्याच्या घडीला संपूर्ण कलाविश्वातूनही सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. याच सर्व प्रतिक्रियांमध्ये एलजीबीटी कार्यकर्ते हरिश अय्यर यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. #LoveIsLove असं लिहित त्यांनीही ‘आपण आता स्वतंत्र झालो आहोत…’, अशी प्रतिक्रिया दिली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांना अनेकांनीच शुभेच्छाही दिल्याचं पाहायला मिळालं.

First Published on September 6, 2018 2:23 pm

Web Title: section 377 verdict lgbtq community people and their views harish iyer