News Flash

दिल्लीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना संरक्षण

आम आदमी पार्टीसह दिल्ली विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या सर्व पक्षांच्या उमेदवारांना संरक्षण देण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांना दिले आहेत.

| November 20, 2013 12:29 pm

आम आदमी पार्टीसह दिल्ली विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या सर्व पक्षांच्या उमेदवारांना संरक्षण देण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांना दिले
आहेत.आम आदमी पार्टीच्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर काळी शाई फेकण्याचा प्रकार सोमवारी घडला असला तरी त्यापूर्वीच केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांनी वरील आदेश दिले होते, असा दावा अधिकृत सूत्रांनी केला आहे. या आदेशानुसार किमान दोन वैयक्तिक सुरक्षा अधिकारी प्रत्येक उमेदवाराच्या संरक्षणासाठी देण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना अगोदरच संरक्षण देण्यात आले आहे त्यांचे संरक्षण कायम ठेवण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2013 12:29 pm

Web Title: security for political leader in delhi
Next Stories
1 बसपाच्या उमेदवाराच्या निधनाने निवडणूक वेळापत्रकात बदल
2 न्यायाधीशाकडून लैंगिक छळ: ‘त्या’ महिला वकिलाने जबाब नोंदवावा- दिल्ली पोलीस
3 प्रियांका गांधींमुळे वाचला ‘त्याचा’ जीव!
Just Now!
X