24 November 2020

News Flash

खतरनाक दहशतवादी समीर टायगर आणि अकीब खानचा भारतीय लष्कराने केला खात्मा

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम परिसरात सोमवारी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे दोघेही 'हिज्बुल'च्या वरच्या फळीतील दहशतवादी होते.

संग्रहित छायाचित्र

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम परिसरात सोमवारी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे दोघेही ‘हिज्बुल’च्या वरच्या फळीतील दहशतवादी होते. एकाचे नाव समीर अहमद भट उर्फ समीर टायगर असून हा हिज्बुल मुजाद्दीनदचा कमांडर स्तराचा A++ दर्जाचा दहशतवादी होता. तर दुसऱ्याचे नाव अकीब खान असून तोदेखील वरच्या फळीतील दहशतवादी होता. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत लष्कराचे दोन जवानही जखमी झाले.

या चकमकीआधी जिल्ह्यातील द्राबगाम परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसारच हा परिसर रिकामा करण्यात आला आणि शोधमोहिम हाती घेण्यात आली होती, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. शोधमोहिम सुरू असताना जवानांना दहशतवाद्यांना शोधण्यात यश आले. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरूवात केली, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 4:28 pm

Web Title: security forces gunned down hizbul terrorist
टॅग Kashmir
Next Stories
1 दुबईच्या फरार राजकन्येला मोदी सरकारनं पकडून दिलं वडिलांच्या ताब्यात?
2 अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ल्यात ११ चिमुरड्यांचा मृत्यू
3 कठुआ बलात्कार : भाजपा आमदाराची सीबीआय चौकशीची मागणी; घटनेच्या निषेधार्थ काढला मोर्चा
Just Now!
X