हिमाचल प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भुंतर विमानतळावर कुल्लूचे पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर या दोघांमध्ये हाणामारीही झाली. हा सर्व प्रकार विमातळाच्या बाहेर त्यावेळी झाला जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचे प्रमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक बृजेश सूद यांनी विमानतळाबाहेर आंदोलकांना पाहिलं.

विमानतळाजवळच्या चारपदरी महामार्गाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना प्रकल्पबाधित मुख्यमंत्री बाहेर येतानाच आंदोलन करताना दिसल्याने सूद यांचा कुल्लूचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्याशी वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की गौरव यांनी सूद यांच्या कानशीलात लगावली. यानंतर इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सूद आणि गौरव हे एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा टीममधील एकाने गौरव यांना लाथाही मारल्या. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व घटना मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासमोर घडली. ते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या दौऱ्यानिमित्त कुल्लूला पोहचले होते.

नक्की वाचा >> सुप्रीम कोर्टात हे असं होत असेल तर देवच आपल्याला वाचवू शकतो : कपिल सिब्बल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे चार दिवसांच्या हिमाचल दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान ते बुधवारी कुल्लूला पोहचले. तिथे मुख्यमंत्री जयराम ठाकूरही उपस्थित होते. भुंतर विमानतळाबाहेर चार पदरी महामार्ग बांधण्यात येणार असल्याने या प्रकल्पाचा फटका बसलेल्या प्रकल्पग्रस्त यावेळी विमानतळाबाहेर एकत्र येऊन आंदोलन करत होते. पोलीस या आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी सूद आणि एसपी गौरव यांच्यामध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावर वाद झाला.

नक्की वाचा >> डिझायनर मनीष मल्होत्रा, सब्यसाची, रितू कुमार ED च्या रडारवर; लवकरच चौकशी होण्याची शक्यता

वाद सुरु असतानाच अचानक गौरव यांनी सूद यांच्या कानशिलात लगावली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सूद यांना काही समजण्याआधीच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करुन या दोघांना एकमेकांपासून दूर लोटलं. सूद यांना गौरव यांनी कानशिलात लगवाल्यानंतर सूद यांच्या सहकाऱ्याने गौरव यांना लाथा मारल्या. हा वाद मुख्यमंत्र्यांसमोर झाला. मात्र नंतर पोलीस कर्मचारी या दोन्ही अधिकाऱ्यांना पोलिसांच्या गाड्यांमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

नक्की वाचा >> भाजपा आयटी सेलच्या दृष्टीने ‘हा’ देशद्रोह नाही का?; काँग्रेस खासदाराचा प्रश्न

या पूर्ण घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा विमानतळाच्या एक्झीट डोअरजवळच होता. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर आंदोलनकर्ते मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दिशेने येऊ लागले. वेळीच पोलिसांनी त्यांना आडवलं आणि मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला वाट मोकळी करुन दिली. या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी भुंतरमधील या हणामारीसंदर्भात तपास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती दिली. घडलेला प्रकार दुर्दैवी असून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

पोलीस मुख्यालयानेही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. चौकशीची जबाबदारी डीजीपींनी डीआयजी सेंट्रल रेजच्या मधुसूदन यांच्याकडे सोपवली आहे. डीजीपी संजय कुंडूसुद्धा काल सायंकाळीच कुल्लूमध्ये दाखल झाले. यासंदर्भातील माहिती हिमाचल प्रदेशचे पोलीस प्रवक्ते भगवत सिंह ठाकुर यांनी दिली.