26 February 2021

News Flash

मोदींच्या सभेसाठी जम्मूमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लवकरच जम्मूमधील एमएएम स्टेडियमवर ‘ललकार सभा’ होत असून, त्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

| November 29, 2013 12:17 pm

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लवकरच जम्मूमधील एमएएम स्टेडियमवर ‘ललकार सभा’ होत असून, त्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी स्टेडियमचा ताबा घेतला असून, गुरुवारी तिथे सर्वसामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती.
नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याने त्यांच्या सभेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून, शहरात ये-जा करणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. शहरात महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक अशोक प्रसाद यांनी घटनास्थळाची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. स्टेडियममधील व्यासपीठ पोलिसांच्या उपस्थित बांधण्यात आले असून, त्याची पाहणीही प्रसाद यांनी केली. एमएएम स्टेडियमवर सभेच्या दिवसापर्यंत सामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बॉम्बशोधक पथकाकडून स्टेडियमची पाहणी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 12:17 pm

Web Title: security system tight in jammu ahead of narendra modis meeting
टॅग : Narendra Modi
Next Stories
1 अबू सालेमला सात वर्षे सश्रम कारावास
2 मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’ला वस्तुस्थितीचा आधार नाही
3 भाजप उमेदवारास आयोगाची तंबी
Just Now!
X