News Flash

मानवी हक्कांसाठी लढणारी महिला देशद्रोहाच्या आरोपामुळे पाकमधून परागंदा

गुलालाई यांनी दिलेल्या आव्हानानंतर न्यायालयाने त्यांचे नाव ईसीएलमधून काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

महिला कार्यकर्त्यां गुलालाई इस्माईल

अमेरिकेला राजकीय आश्रयाची विनंती

न्यू यॉर्क :  देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आलेल्या पाकिस्तानातील महिला कार्यकर्त्यां गुलालाई इस्माईल (३२) या पाकिस्तानातून परागंदा झाल्या असून त्यांनी अमेरिकेत राजकीय आश्रयाची मागणी केली असल्याचे वृत्त येथील माध्यमांनी दिले आहे.

परदेशात देशविरोधी कारवाया केल्याबद्दल गुलालाई यांचे नाव एक्झिट कंट्रोल यादीत (ईसीएल) टाकावे, अशी शिफारस पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने केली होती. गुलालाई गेल्या महिन्यात पाकिस्तानातून परागंदा झाल्या असून त्या सध्या ब्रूकलिन येथे बहिणीसमवेत वास्तव्य करीत आहेत, असे वृत्त गुरुवारी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिले आहे.

गेल्या मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या गुलालाई यांनी त्या पाकिस्तानातून कशा परागंदा झाल्या त्याची मााहिती दिलेली नाही. आपण कोणत्याही विमानतळावरून उड्डाण केले नाही आणि यापेक्षा अधिक आपण सांगू शकत नाही, कारण त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात जाईल, असे गुलालाई यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

परदेशामध्ये देशविरोधी कारवाया केल्याबद्दल गुलालाई यांचे नाव ईसीएलमध्ये टाकण्याची शिफारस आयएसआयने केली असल्याचे गेल्या नोव्हेंबर महिन्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयास सांगण्यात आले होते. मात्र गुलालाई यांनी दिलेल्या आव्हानानंतर न्यायालयाने त्यांचे नाव ईसीएलमधून काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

भारताविरुद्ध अपप्रचार करणारा पाकिस्तान तोंडघशी

वॉशिंग्टन : काश्मीर खोऱ्यात मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याची ओरड पाकिस्तानकडून केली जात असतनाच शुक्रवारी पाकिस्तान चांगलात तोंडघशी पडला. उजव्या विचारसरणी कार्यकर्त्यां गुलालाई इस्माईल या पाकिस्तानातून परागंदा झाल्या आणि त्यांनी जिवाच्या भीतीने अमेरिकेत जाऊन राजकीय आश्रय देण्याची विनंतीकेली आहे. भारताकडून काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा अपप्रचार पाकिस्तान करीत असतानाच त्यांनी या आठवडय़ात अमेरिकेकडे आश्रय देण्याची मागणी केली. पाकिस्तानातील जे दहशतवादी काश्मीरमध्ये हिंसाचार घढवितात ते काश्मीर आणि पाकिस्तान या दोघांचे शत्रू आहेत,या पाकिस्तानचे पंत्प्रधान इम्रान खान यांच्या निवेदनाचे ट्रम्प प्रशासनाने कौतुक केले आहे. मात्र पाकिस्तानमधील मानवी हक्क कार्यकर्ते आता देशातून परागंदा होत आहेत, असे ट्वीट डेक्लन वॉल्श या पाकिस्तानातील ‘गार्डियन’च्या प्रतिनिधींनी केले आहे. गुलालाई यांच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळे पाकिस्तानातील मानवी हक्कांची स्थिती समोर येत आहे, असे ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 2:34 am

Web Title: sedition charges on woman fighting for human rights in pakistan flees to us zws 70
Next Stories
1 जागावाटपात मुस्लिमांकडे प्रदेश काँग्रेसचे दुर्लक्ष
2 संयुक्त राष्ट्रांत काश्मीरवर चर्चेची शक्यता
3 संयुक्त राष्ट्रांना भारताकडून ‘सोलर’ भेट
Just Now!
X