गणपती बाप्पाचं आगमन गुरुवारी अत्यंत उत्साहात आणि आनंदात झालं. आता आम्ही तुम्हाला सांगतो आहोत चॉकलेटच्या बाप्पाबद्दल! हरजिंदर सिंग कुकरेजा या गणेशभक्ताने चॉकलेटमधून बाप्पा साकारला आहे. चॉकलेटचा हा बाप्पा आपले लक्ष नक्कीच वेधून घेतोय. त्याचा व्हिडिओ कुकरेजा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. चॉकलेटचा गणपती साकारण्यासाठी २० शेफ १० दिवस मेहनत घेत होते. हा गणपती साकारण्यासाठी ६५ किलो चॉकलेट लागले. चॉकलेटचा बाप्पा घरी येण्याचे हे आमचे तिसरे वर्ष आहे असेही कुकरेजा यांनी म्हटले आहे. पंजाबमधील लुधियाना या ठिकाणी कुकरेजा यांच्या घरी हा चॉकलेटचा बाप्पा विराजमान झाला आहे.

पाहा व्हिडिओ