News Flash

स्वयंघोषित संत रामपाल यांना मोठा दिलासा : दोन गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता; मात्र, तुरुंगातील मुक्काम कायम राहणार

देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरु राहणार

स्वयंघोषित संत रामपाल (संग्रहित छायाचित्र)

हरियाणातील आणखी एक स्वयंघोषित संत रामपाल यांना स्थानिक न्यायलयाने मोठा दिलासा दिला आहे. दोन गुन्ह्यांतून त्यांची मुक्तता करण्यात आल्याचे त्यांचे वकिल ए. पी. सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. हा खऱ्याचा विजय असल्याचेही सिंह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. मात्र, असे असले तरी रामपाल यांची तुरुंगातून मुक्तता होणार नाही. कारण, देशद्रोह आणि हत्येचा खटला त्यांच्यावर सुरु राहणार आहे. बाबा राम रहिम यांना विशेष न्यायालयाने बलात्काराच्या दोन गुन्ह्यांमध्ये २० वर्षांसाठी शिक्षा ठोठावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर संत रामपाल यांच्या खटल्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.


लोकांना कैद करुन ठेवणे आणि पोलिसांवर हल्ला करणे या दोन गुन्ह्यांतून रामपाल यांची न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. सतलोक आश्रमात जेव्हा पोलिस त्यांना पकडायला आले तेव्हा रामपाल समर्थकांकडून त्याठिकाणी पोलिसांवर हल्ला झाला होता. त्यानंतर या आश्रमातून ज्या लोकांना बाहेर काढण्यात आले होते, त्यांनी आम्हाला रामपाल यांनी आश्रमात कैदेत ठेवल्याचे सांगितले होते.

२००६ मध्ये हे प्रकरण सुरु झाले होते. त्यावेळी रामपाल यांनी ‘सत्यार्थ प्रकाश’ या धार्मिक पुस्तकातील काही भागावर आक्षेप घेतला होता. यामुळे रामपाल आणि आर्य समाजाच्या लोकांमध्ये वाद निर्माण झाला होता. यावेळी लोकांनी रोहतकमधील रामपाल यांचा आश्रम बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रामपाल यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर गोळीबारही केला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर १६० जण जखमी झाले होते.

यानंतर न्यायालयाने रामपाल यांना ४३ वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही रामपाल न्यायालयात हजेरी लावत नव्हते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पोलिस रामपाल यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या रोहतक येथील आश्रमात पोहोचले होते. मात्र, याठिकाणी रामपाल यांचे १५ हजार समर्थक आधीच हजर होते. यावेळी त्यांनी पोलिसांवरच दगडफेक, गोळीबार, पेट्रोल बॉम्ब आणि अॅसिड बॉम्बचा हल्ला चढवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 3:39 pm

Web Title: self styled sant rampal has been acquitted in the two criminal cases says his lawyer a p singh
Next Stories
1 अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी दुतावासाजवळ बॉम्बस्फोट
2 पर्यावरण प्रदूषित केल्यास आता थेट ५ कोटींचा दंड?
3 आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चच; राज्यांच्या असहकार्यामुळे मोदी सरकार बॅकफूटवर
Just Now!
X