ब्रिटनमध्ये एका एकवीस वर्षीय विद्यार्थ्यांने पदवीदान कार्यक्रमात प्रख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांच्यासमवेत सेल्फी काढला आहे. लंडनच्या ‘द क्वीन्स मेरी’ विद्यापीठातून त्याने भूगोलात पदवी घेतली असून हॉकिंग हे त्यावेळी त्यांच्या मुलीला ‘डॉक्टर ऑफ सायन्सेस’ पदवी मिळणार म्हणून उपस्थित होते. ग्रीनवूड याला हॉकिंग व्हीलचेअरवर दिसले ते कार्यक्रम संपल्यावर जात असताना. तो त्यांच्यासमवेत हिरवळीवर चालत गेला व त्यांच्यासमवेत सेल्फी काढले. ते हॉकिंगच आहेत याची त्याने त्या कार्यक्रमात त्यांच्या मुलीचे नाव आहे यावरू न खात्री केली. हॉकिंग हे सध्या केंब्रिज येथे सेंटर फॉर थिऑरॉटिकल कॉस्मॉलॉजी या संस्थेचे संचालक आहेत. त्यांना अमायट्रॉपिक लॅटरल स्क्लेरॉसिस (मोटर न्यूरॉन डिसीज) आजार असून ते वयाच्या २१ व्या वर्षांपासून जायबंदी झालेले आहेत.