काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मेघालयचे माजी राज्यपाल एम.एम.जेकब यांचं केरळच्या कोट्टायम येथे खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावली होती असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं.

सोमवारी केरळच्या पलई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 1995 ते 2007 या काळात ते मेघालयचे राज्यपाल होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि पी.व्ही. एन. राव यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीही होते. काँग्रेस पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहून ते सक्रिय राजकारणात आले होते.

केरळ काँग्रेसने रविवार आणि सोमवारचे आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.