27 October 2020

News Flash

पत्नीला मारहाण : शर्मा यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली माहिती

आयपीएस अधिकारी पुरूषोत्तम शर्मा. (छायाचित्र-एएनआय)

मध्य प्रदेशात विशेष पोलीस महासंचालकपदी कार्यरत असलेले पुरुषोत्तम शर्मा यांना राज्य सरकारनं तडकाफडकी पदावरून दूर केलं आहे. आयपीएस अधिकारी असलेल्या पुरुषोत्तम शर्मा यांचा पत्नीला मारहाण करतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरुषोत्तम शर्मा याचं नाव एका व्हायरल झालेल्या व्हिडीओनं चर्चेत आलं होतं. पुरुषोत्तम शर्मा सध्या मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेलं होतं. काही दिवसांपासून महासंचालकांचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये शर्मा हे एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडीओमधील महिलेला शर्मा बेदम मारहाण करताना जमिनीवर आपटतात आणि नंतर बुक्के मारतानाही दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या महिलेला मारहाण केली जात आहे ती शर्मा यांची पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमांमध्ये पुरुषोत्तम शर्मा यांचं नावं चर्चेत आलं. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं त्यांनी विशेष पोलीस महासंचालक पदावरून दूर केलं आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याची माहिती दिली.

आणखी वाचा- IPS अधिकाऱ्याला पत्नीने प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडलं, पत्नीला घरी येऊन केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अधिकारी म्हणतो…

शर्मा यांच्या पत्नीने त्यांना दुसऱ्या महिलेबरोबर (जी त्यांची प्रेयसी असल्याचे सांगण्यात येत आहे) रंगेहाथ पकडल्यानंतर या पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. घरी आल्यानंतरही या दोघांमधील वाद अगदी शिगेला पोहचला. त्यामुळेच संतापलेल्या शर्मा यांनी पत्नीला बेदम मारहाण केली. याच मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 4:13 pm

Web Title: senior ips officer purushottam sharma relieved of duties madhya pradesh cm shivraj singh chouhan bmh 90
Next Stories
1 पावसाला लागले परतीचे वेध
2 “केंद्र सरकार, दिल्ली पोलीस उघड्यावर गांजा विक्री करतात आधी ती साफसफाई करा,” शिवसेनेचा नेता पात्रांवर संतापला
3 दिलासादायक : देशात ५० लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी केली करोनावर मात
Just Now!
X