News Flash

यूपीए सरकार पाडण्यासाठी एक ज्येष्ठ नेता माझ्या संपर्कात होता: गडकरींचा गौप्यस्फोट

केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकार पाडण्यासाठी एका ज्येष्ठ नेत्याने आपली भेट घेतली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केलाय.

| April 12, 2013 06:33 am

केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकार पाडण्यासाठी एका ज्येष्ठ नेत्याने आपली भेट घेतली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केलाय. 
गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना संबंधित नेता हा सातत्याने त्यांच्या संपर्कात होता. त्यावेळी त्याने सरकार पाडण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, गडकरी यांनी त्याची मागणी साफपणे फेटाळली होती. त्या व्यक्तीचे नाव गडकरींनी स्पष्ट केलेले नाही. मला जे काही करायचे आहे, ते सर्वांसमोरच करेन, असे आपण त्या व्यक्तीला सांगितल्याचेही गडकरींनी स्पष्ट केले.
गडकरी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत बोलताना ते म्हणाले, मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांनी माझ्या पूर्ती समूहातील कंपन्यांची चौकशी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 6:33 am

Web Title: senior leader approached me to topple upa ii says nitin gadkari
टॅग : Nitin Gadkari
Next Stories
1 बेळगावात पोलिसी दंडेली
2 ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार
3 नवज्योतसिंग सिद्धूसाठी आता कॉंग्रेसची ‘फिल्डिंग’!
Just Now!
X