News Flash

NCP leader DP Tripathi passes way : राष्ट्रवादीचे नेते डी. पी. त्रिपाठी यांचे निधन

Senior NCP leader DP Tripathi passes away after prolonged illness : ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस होते

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि डी. पी. त्रिपाठी (फाइल फोटो)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.पी. त्रिपाठी यांचे निधन झाले आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असणारे त्रिपाठी हे मागील बऱ्याच काळापासून आजाराने त्रस्त होते. ते ६७ वर्षांचे होते. दिल्लीमधील खासगी रुग्णालयामध्ये त्रिपाठी यांनी शेवटचा श्वास घेतला.

सुल्तानपूरमध्ये जन्म…

डी. पी. त्रिपाठी म्हणजेच देवी प्रसाद त्रिपाठी यांचा जन्म ६ जानेवारी १९५४ रोजी उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूरमध्ये झाला होता. तरुणपणी महाविद्यालयामध्ये शिकताना त्यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापिठातील विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर त्यांनी इलाहाबाद विद्यापिठामध्ये राजकारणाचे प्राध्यापक म्हणून कामही केले.

१६ व्या वर्षी राजकारणात प्रवेश

वयाच्या १६ व्या वर्षापासूनच त्रिपाठी सक्रीय राजकारणामध्ये सहभागी झाले होते. अगदी तरुण वयामध्येच त्यांना तत्कालीन युवा नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्रिपाठी हे अल्पावधीमध्येच राजीव यांच्या निटवर्तीय सहकाऱ्यांच्या गटामध्ये गणले जाऊ लागले.

सोनियांचा विरोध म्हणून काँग्रेस सोडली…

राजीव गांधींच्या निधनानंतर काही वर्षांनी सोनिया गांधीचे नेतृत्व न पटल्याने त्रिपाठी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा त्रिपाठी हे राष्ट्रवादीमध्ये गेले.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात…

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच त्यांनी पक्षासाठी बरेच काम केले. त्यांनी राष्ट्रवादीचे महासचिव आणि प्रमुख प्रवक्ते म्हणून काम केले. ते ३ एप्रिल २०१२ ते २ एप्रिल २०१८ या कालावधीसाठी राज्यसभेचे खासदार होते.

सुप्रिया सुळे म्हणतात…

त्रिपाठी यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळ्ये यांनी ट्विटवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “डी.पी. त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल ऐकून दु:खी झाले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. ते आमच्यासाठी सर्वांसाठी मार्गदर्शक होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच त्यांनी पक्षाला वेळोवेळी दिलेले सल्ले आणि मार्गदर्शन याला आम्ही आता मुकणार. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. आमच्या सद्भभावना त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहेत,” असं सुप्रिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

त्रिपाठी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचे एक राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व गमावल्याची हळहळ पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 12:04 pm

Web Title: senior ncp leader dp tripathi passes away after prolonged illness scsg 91
टॅग : Ncp
Next Stories
1 Tata Sons moves SC: सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीवर स्थगिती आणा, टाटा सन्सची सुप्रीम कोर्टात याचिका
2 दिल्लीत आग विझवताना इमारत कोसळली; जवानांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले
3 बिहार निवडणुकांआधी भाजपाचं सावध पाऊल, जदयूला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचे संकेत
Just Now!
X