20 September 2020

News Flash

यूपीत पुन्हा ‘यादवी’; मुलायमसिंह सांभाळणार ‘समाजवादी सेक्युलर मोर्चा’

शिवपाल यांची घोषणा

अखिलेश यादव, मुलायमसिंह यादव आणि शिवपाल यादव. (संग्रहित)

उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबात वर्चस्वाची लढाई अद्याप सुरुच आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या गटातील रामगोपाल यादव यांना ‘शकुनी’ म्हणणाऱ्या शिवपाल यादव नवा पक्ष स्थापन करणार आहेत. समाजवादी सेक्युलर मोर्चा असे नव्या पक्षाचे नाव असणार आहे. मुलायम सिंह यादव हे पक्षाचे प्रमुख असतील, अशी माहिती शिवपाल यांनी ‘एएनआय’ला दिली.

समाजवादी पक्षातील वर्चस्वाची लढाई आता टोकाला गेली आहे. शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्युलर मोर्चा या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. नेताजी (मुलायम सिंह यादव) यांचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी, तसेच समाजवाद्यांना एका छताखाली आणण्यासाठी नव्या पक्षाची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे शिवपाल यांनी जाहीर केले. समाजवादी पक्षातील वर्चस्वाची लढाई तीव्र होत चालली आहे. एकीकडे अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव शिवपाल गटावर हल्लाबोल करत असून शिवपालही अखिलेश यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्याचदरम्यान, बुधवारी शिवपाल यांनी अखिलेश यांना इशारा दिला होता. पुढील तीन महिन्यांत मुलायम सिंह यादव यांना समाजवादी पक्षाचे अध्यक्षपद न दिल्यास पक्षात फूट पडेल, असे ठणकावून सांगितले होते. अखिलेश यादव यांनी तसे न केल्यास सेक्युलर मोर्चा स्थापन करण्यात येईल. हा नवा पक्ष जातीयवादी शक्तींचा सामना करेल, असे त्यांनी सांगितले होते. यानंतर रामगोपाल यांच्यावर हल्ला चढवत त्यांना शकुनी असे संबोधले होते. पक्षाची घटना वाचली नाही तरी चालेल पण शकुनीने गीता जरुर वाचली पाहिजे, असा टोलाही शिवपाल यांनी लगावला होता. तीन महिन्यांच्या आत सेक्युलर मोर्चा स्थापन केला जाईल, असे शिवपाल यांनी इटावा येथील पत्रकार परिषदेत सांगितले होते. जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी दुसरा पर्याय नाही. नेताजी यांना पुन्हा पक्षाचे अध्यक्षपद द्यावे, असे त्यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 1:30 pm

Web Title: senior samajwadi party leader shivpal yadav forming new party samajwadi secular morcha mulayam singh yadav
Next Stories
1 कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री रेखा सिंधूचे अपघाती निधन
2 Nirbhaya Gangrape Case: निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींना फाशीच, सुप्रीम कोर्टाचा निकाल
3 Air India Issues :एअर इंडिया बेशिस्त प्रवाशांचे ‘पंख’ छाटणार! हवाईबंदीचा नियम
Just Now!
X