20 September 2020

News Flash

फुटीरवादी संघटनांचा काश्मिरात ‘बंद’

स्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठी काश्मीर खोऱ्यात स्वतंत्र वसाहत वसवण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ फुटीरवादी संघटनांनी शनिवारी पुकारलेल्या ‘बंद’मुळे काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले होते.

| April 12, 2015 05:02 am

स्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठी काश्मीर खोऱ्यात स्वतंत्र वसाहत वसवण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ फुटीरवादी संघटनांनी शनिवारी पुकारलेल्या ‘बंद’मुळे काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले होते.
श्रीनगरमधील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, शैक्षणिक संस्था व पेट्रोल पंप बंद होते, तर सरकारी कार्यालयांमधील उपस्थिती रोडावली होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होती, तर खाजगी मोटारी, टॅक्सीज व ऑटोरिक्षा काही ठिकाणी धावत होत्या. काश्मीर खोऱ्यातील इतर जिल्हा मुख्यालयांमध्येही अशीच परिस्थती होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 5:02 am

Web Title: separatists protest against separate township for kashmiri pandits
Next Stories
1 धाडसी राजकीय निर्णयामुळेच राफेलचा सौदा मार्गी
2 ‘सुभाषचंद्रांच्या नातेवाईकांवर गुप्तहेर नेमल्याची चौकशी करू’
3 रेल्वे क्षेत्रात फ्रान्सचे भारताला सहकार्य
Just Now!
X