News Flash

महिलेची हत्या केल्यानंतर प्रेतासोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या विकृत सीरियल किलरला अटक

लोखंडी रॉड डोक्यात टाकून महिलेची हत्या केल्यानंतर रक्ताळलेल्या प्रेतासोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या विकृत सीरियल किलरला पोलिसांनी अटक केली आहे.

लोखंडी रॉड डोक्यात टाकून महिलेची हत्या केल्यानंतर रक्ताळलेल्या प्रेतासोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या विकृत सीरियल किलरला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली आहे. कामरूजम्मन सरकार असे आरोपीचे नाव असून त्याला १२ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये २०१३ मध्ये झालेल्या हत्यांमध्येही कामरूजम्मनचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.

कामरूजम्मन सरकार छोटा व्यापारी आहे. पूर्व बर्दवान आणि शेजारच्या हुगली जिल्ह्यात झालेल्या पाच महिलांच्या हत्या प्रकरणात कामरूजम्मन संशयित आहे. नेहमीच नीट नेटक्या पोषाखामध्ये रहाणारा कामरूजम्मन दुपारच्या वेळी महिला घरात एकटया असताना मीटरचे रीडिंग घेण्याच्या बहाण्याने घरामध्ये प्रवेश करायचा. त्यानंतर तो सायकलची चेन आणि लोखंडी रॉडने घरातील महिलेवर हल्ला करायचा.

पुतूल माझी या महिलेच्या हत्ये प्रकरणी त्याला जिल्हा न्यायालयने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य चार महिलांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांना त्याची कोठडी मिळाली आहे. सुदैवाने काही महिला त्याच्या हल्ल्यातून बचावल्या. सायकलच्या चेनने महिलेचा गळा आवळल्यानंतर तो महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करायचा.

बळी पडलेल्या महिलेच्या घरातून तो काही वस्तुंची चोरी करायचा. पण या हत्यांमागे चोरी हा त्याचा मुख्य उद्देश कधीच नव्हता. महिलेची हत्या हे त्याचे मुख्य लक्ष्य असायचे असे बर्दवानचे पोलीस अधीक्षक भास्कर मुखोपाध्याय यांनी सांगितले. मध्यमवयीन महिलांना तो का लक्ष्य करायचा? हे आम्ही त्याच्याकडून समजून घेत आहोत असे मुखोपाध्याय यांनी सांगितले.

कामरूजम्मन सरकारचे लग्न झाले असून त्याला तीन मुले आहेत. कामरूजम्मन सरकार ज्या वयोगटातील महिलांना लक्ष्य करायचा त्यांच्याबद्दल त्याच्या मनात काही व्यक्तीगत राग असण्याची शक्यता आहे असे पोलिसांनी सांगितले. आरोपी कामरूजम्मन सरकारला रविवारी कालना येथे अटक करण्यात आली. तो मोटार सायकलवरुन चालला होता. संशयिताने लाल रंगाचे हेल्मेट घातल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी अन्य पोलीस स्थानकांना पाठवले होते. त्या आधारावर त्याला अटक करण्यात आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 2:20 pm

Web Title: serial killer amrujamman sarkar arrested who had sex with women after killing them in west bengal
Next Stories
1 घरासमोर लघुशंका केली म्हणून कानाखाली लगावणाऱ्याची दगडानं ठेचून हत्या
2 आम्ही सुद्धा स्वबळावर लढू, अखिलेश यांचे मायावतींना प्रत्युत्तर
3 भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनणार; ब्रिटनलाही टाकणार मागे
Just Now!
X