News Flash

सीरियल किलरला कुंभ मेळयातून अटक, सहा महिन्यात केल्या दहा हत्या

प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभ मेळयातून एका ३८ वर्षीय सीरियल किलरला अटक करण्यात आली आहे.

प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभ मेळयातून एका ३८ वर्षीय सीरियल किलरला अटक करण्यात आली आहे. प्रयागराज आणि आसपासच्या परिसरात मागच्या सहा महिन्यात त्याने १० जणांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. कुंभ मेळयामध्ये तो दोन साधूंची हत्या करण्याची योजना बनवत होता. शुक्रवारी या खतरनाक आरोपीला अटक करण्यात आली. या सीरियल किलरच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अन्य तिघांचा रुग्णालयात जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे.

कालूवा असे आरोपीचे नाव असून तो प्रयागराज जिल्ह्यातील बेसहारा गावचा रहिवाशी आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नितीन तिवारी यांनी दिली. झोपलेल्या लोकांवर धारदार शस्त्राने वार करण्याची त्याची पद्धत होती. सीसीटीव्ही फुटेजमुळे या सीरियल किलरला अटक करता आली.

शहरातील वेगवेगळया भागांमध्ये त्याने दहा खून केले. या हत्या करण्यामागे काय उद्दिष्टय होते ते समोर आलेले नाही. पोलिसांनी त्याच्याकडून कुऱ्हाड आणि लाकडी बॅट जप्त केली. सीरियल किलरला अटक करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 5:01 am

Web Title: serial killer who murdered 10 people in 6 months held at kumbh mela
Next Stories
1 ट्रम्प यांची विरोधकांबरोबर डील! तीन आठवडयांसाठी अमेरिकेची शटडाऊनमधून सुटका
2 ‘सर्वच लोकशाही संस्थांत संघाचा घुसखोरीचा प्रयत्न’
3 ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कृष्णा सोबती यांचे निधन
Just Now!
X