News Flash

सीरममध्ये जुलै महिन्यात मुलांसाठी Novavax लशीच्या चाचणीस सुरूवात होण्याची शक्यता

पुण्यातील देशातील सर्वात मोठी औषध कंपनी सीरम संस्था आता मुलांवर Novavax लशीची चाचणी घेण्याची योजना आखत आहे.

जुलै महिन्यात सीरम संस्था मुलांवर Novavax लशीची चाचणी घेऊ शकते

पुण्यातील देशातील सर्वात मोठी औषध कंपनी सीरम संस्था मुलांवर Novavax लशीची चाचणी घेण्याची योजना आखत आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. जुलै महिन्यात सीरम संस्था मुलांवर Novavax लशीची चाचणी घेऊ शकते. एएनआयने म्हटले आहे की, सीरम संस्था सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनी Novavax कोरोना लस देशात येण्याची अपेक्षा करत आहे.

दरम्यान, लस निर्मिती करणारी कंपनी नोवाव्हॅक्सने दावा केली आहे की, त्यांची लस करोनाच्या व्हेरिअंट विरोधात ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. कंपनीने अमेरिकेत मोठ्याप्रमाणावर संशोधन केल्यानंतर लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे.

अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली होती. ज्या अंतर्गत २०० कोटी लस निर्मिती केली जाणार होती.

हेही वाचा- केंद्र सरकारने करोना लसीच्या डोसची किंमत केली निश्चित! खासगी रुग्णालयात ‘हे’ असतील दर!

नोवाव्हॅक्स लशीची साठवण आणि वाहतूक करणे सोपे

कंपनीने म्हटले की, लस करोनाविरोधात ९० टक्के प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे व प्रारंभीच्या आकडेवारीनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही समोर आलं आहे. नोवाव्हॅक्सच्या लसीबाबत ही माहिती अशावेळी समोर आली आहे, जेव्हा जगभरात करोना विरोधातील लशीची प्रचंड मागणी सुरू आहे.

अमेरिकेत मोठ्याप्रमाणात लसीकरण होत असल्याने, तिथे लस तुटवडा जाणवत आहे. नोवाव्हॅक्स लशीची साठवण आणि वाहतूक करणे सोपे असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे विकसनशील देशांना लस पुरवठा करण्यात ही लस मोठं योगदान देण्याची शक्यता आहे. कंपनीने सांगितले की, सप्टेंबरच्या शेवटापर्यंत अमेरिका-युरोप व अन्य ठिकाणी लसीकरणासाठी या लशीला मंजुरी मिळवी या दिशेने प्रयत्न सुरू आहेत आणि तोपर्यंत एका महिन्यात दहा कोटी लस निर्मिती करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 5:19 pm

Web Title: serum institute to begin novavax vaccine trials for children in july srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Kumbh Mela 2021: करोना चाचणी घोटाळा मी शपथ घेण्याच्या आधीचा; मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
2 गौतम अदानी यांचे १.१ अब्ज रुपयांचे नुकसान, आशियातील श्रीमंतांच्या यादीतही घसरण
3 CBSE बोर्डाचा निर्णय….२० जुलैला लागणार १०वी चा निकाल!
Just Now!
X