सिरम इन्स्टिट्युट करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लशीचे १० कोटी अतिरिक्त डोस तयार करणार आहे.  सीरम आणि गावी यांनी करोनावरची जी लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या लशीचे १० कोटी अतिरिक्त डोस तयार करण्यात येणार आहेत. मंगळवारी या संदर्भातली घोषणा सीरमने केली आहे. या लस निर्मितीच्या प्रक्रियेत बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचाही वाटा असणार आहे. १० कोटी डोस तयार करण्याच्या प्रक्रियेला ही फाऊंडेशन गती देईल. भारतासाठी आणि आर्थिक दृष्ट्या मागास देशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. करोनाचा फैलाव रोखणाऱ्या लशीच्या निर्मिती संदर्भात सिरमने फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच नाही, तर जगातील वेगवेगळया लस संशोधन करणाऱ्या संस्थांबरोबर करार केले आहेत. सध्या भारतात सिरमकडून ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. सिरमने अस्त्राझेनेकाप्रमाणेच अमेरिकन बायोटेक कंपनी कोडेजेनिक्स बरोबरही लस निर्मितीचा करार केला आहे.

पुणे येथील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या वतीनं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेकासोबत करोनावर लस विकसीत करण्यात येत आहे. सिरम ही संस्था जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती करणाऱ्या संस्थांपैकी एक आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात जी लस विकसित केली जात आहे. त्या लसीच्या उत्पादनात या कंपनीची भागीदारी आहे.