News Flash

Good News : भारतातील ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

सुरूवातीच्या टप्प्यातील निकाल उत्तम

भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे.

संपूर्ण मूल्यांकनानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट समितीच्या तज्ज्ञांनी ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ला एक शिफारस केली आहे. यामध्ये सिरम इन्स्टीट्यूला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यास सांगितलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिली. या आठवड्याच्या सुरुवातीला समितीने सिरम इन्स्टिट्य़ूटला लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी सुधारित प्रोटोकॉल तयार करण्यास सांगितलं होतं. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अ‍ॅस्ट्राझेनेकाबरोबर या लसीला विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे.

ऑक्सफर्डच्या या लसीनं आतापर्यंत चांगली प्रगती केली आहे. तसंच ऑक्सफर्डच्या ज्या लसीवर संशोधन सुरू आहे त्याचे सुरूवाती निकाल उत्तम आहेत. तसंच ही लस सुरक्षितही आहे अशी माहिती लॅन्सेन्ट मेडिकल जर्नलनं आपल्या अहवालात दिली आहे. ऑक्सफर्डच्या संशोधकांसोबत भागीदार असणारी जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती कंपनी सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी सुरूवातीच्या चाचणीमध्ये लसीचे सकारात्मक निकाल आले असून आम्हाला याचा प्रचंड आनंद असल्याचं म्हटलं होतं. भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं महत्त्वाचं आहे. कारण या लसीसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. जगभरात अनेक लसी विकसित केल्या जात असून ऑक्सफर्डची लस त्यापैकी एक आहे. ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचं यश आता फार महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 9:13 am

Web Title: serum institutes oxford name recommended for phase 2 3 human trials of covid 19 vaccine candidate jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचा रॉकेट हल्ला; ९ जणांचा मृत्यू
2 करोनाचा कहर : जुलै महिन्यात देशात ११ लाख रुग्णांची नोंद
3 परीक्षा होणारच!
Just Now!
X