सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये आहेत. त्यानंतर आता त्यांचे वडील सायरस पुनावाला हे देखील लंडनमध्ये गेल्याने अफवांना ऊत आला आहे. देश सोडून गेल्याच्या वावड्या उठू लागल्या आहेत. त्यावर सायरस पुनावाला यांनी स्पष्टीकरण देत अफवांचं खंडन केलं आहे. कुठेही पळून गेलो नसल्याचं त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

“आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये जातो. माझा मुलगा पळून गेल्याचा अफवा उडाल्या आहेत. त्या सर्व बातम्या खोट्या आहेत. मे महिन्यात लंडनमध्ये येणं ही काय आमच्यासाठी नविन बाब नाही. आम्ही दरवर्षी लंडनमध्ये येतो”, असं सायरस पुनावाला यांनी मुलाखती दरम्यान सांगितलं. “आमची कंपनी यूरोपमध्ये लशींसाठी नवं यूनिट उभं करण्याच्या तयारीत आहे. यासाठी आमची इथल्या सरकारसोबत बोलणी सुरु आहेत. असं असलं तरी भारतातील लस उत्पादन सुरु राहील”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Covid 19: लढाई कठीण होणार आहे, सज्ज राहा- उद्धव ठाकरे

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करोनावरील कोविशील्ड लशींचं उत्पादन केलं जात आहे. या कंपनीत सर्वाधिक लशींचं उत्पादन केलं जातं आहे. मात्र गेल्या काही दिवसात लशींचं उत्पादन कमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यातच सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये गेल्याने अफवांचं पीक आलं होतं. त्यानंतर त्यांनी धमकीचे फोन येत असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर राजकारणाला उत आला होता.

करोना उपचारातून प्लाझ्मा थेरपी वगळणार?

अदर पुनावाला यांनी ब्रिटनमधील Mayfair येथे एक आलिशान बंगला भाड्याने घेतला आहे. या बंगल्यासाठी अदर पुनावाला एका आठवड्यासाठी तब्बल ५० लाख रुपये मोजत आहेत. अदर पुनावाला यांनी पोलंडचे अब्जाधीश उद्योगपती डोमिनिका कलजिक यांच्याकडून हा बंगला भाड्याने घेतला आहे. ब्रिटनमधील सर्वात मोठ्या घरांपैकी एक असणारं हे घर जवळपास २५ हजार फुटांच्या परिसरात आहे. ब्रिटनमधील जवळपास २४ घरं या जागेवर सामावतील इतका परिसर मोठा आहे.