सरकारने सेवाकरात वाढ केल्याने उपाहारगृहातील खाद्यपदार्थ, भ्रमणध्वनीचा वापर आणि हवाई तसेच रेल्वेप्रवास सोमवारपासून महागला आहे. सरकारने १२.३६ टक्क्यांवरून सेवाकर १४ टक्के करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली.

रेल्वे, हवाई प्रवास, बँकिंग, विमा, जाहिरात, बांधकाम, क्रेडिट कार्ड आदी क्षेत्रांना सेवाकरवाढीचा फटका बसणार आहे. मोबाइल आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना सेवाकरवाढीबाबतचे संदेश यापूर्वीच निर्गमित केले आहेत. प्रवासी गाडय़ांमधील प्रथम वर्ग आणि वातानुकूलित वर्ग त्याचप्रमाणे मालवाहतुकीच्या दरात ०.५ टक्के वाढ झाली आहे.