संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. संसदीय कामकाज कॅबिनेट समितीने पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत घेण्याची शिफारस केली होती. सलग १८ दिवस सुट्टी न घेता संसदेचे कामकाज होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकसभेचे कामकाज १४ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता सुरु होईल. त्याच दिवशी राज्यसभेचे कामकाज अन्य वेळेत असेल अशी शक्यता आहे. करोनामुळे काही उपाययोजना आखण्यात येत आहेत, सर्व खासदारांची चाचणी केली जाणार आहे, अंतराचा नियम पाळण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा सभागृहातील गॅलऱ्यांमध्ये आसनव्यवस्था आहे.