21 January 2021

News Flash

नागेश्वर राव यांना दणका, सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी १ लाख रुपयांचा दंड

यानंतरही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. यासाठी तत्कालीन संचालक नागेश्वर राव यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले होते.

संग्रहित छायाचित्र

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सीबीआयचे माजी संचालक नागेश्वर राव यांना मंगळवारी दणका दिला. कोर्टाने नागेश्वर राव यांना दोषी ठरवत त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांना कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कोपऱ्यात बसण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील वसतीगृहात राहणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार गेल्या वर्षी समोर आला होता. या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची बदली करु नये, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने यापूर्वी झालेल्या सुनावणीत दिले होते. मात्र, यानंतरही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. यासाठी तत्कालीन संचालक नागेश्वर राव यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले होते.

सोमवारी सुप्रीम कोर्टात नागेश्वर राव यांनी लेखी माफी मागितली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत नागेश्वर राव यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कोर्टाने नागेश्वर राव यांना दोषी ठरवत त्यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यांना कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत एका कोपऱ्यात बसण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 12:19 pm

Web Title: set back to ex interim cbi director nageshwar rao supreme court fine of rs one lakh
Next Stories
1 Rafale Deal : मोदींचे काम एखाद्या हेरासारखेच, त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे: राहुल गांधी
2 पुलवामा येथे चकमकीत दोन जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा
3 VIDEO – पंतप्रधान मोदींसमोरच त्रिपुराच्या मंत्र्याने महिला मंत्र्याच्या कमरेवर ठेवला हात
Just Now!
X