स्वयंघोषित गुरू आसाराम बापू यांनी आपल्यावर सुरू असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या आरोपांवरून दाखल खटल्यांच्या बातम्यांवर बंदी घालण्यासाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
आसाराम बापूंच्या पत्नी, मुलीची चौकशी
न्यायालयाच्या या निर्णयामुळे आसाराम बापूंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. त्यांच्यावर सुरु असलेल्या खटल्यांच्या बातम्या आता स्वतंत्रपणे प्रसारित करण्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. आसाराम बापू सध्या सुरतमधील सख्ख्या बहिणींनी दाखल केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याप्रकरणी गुजरात पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणी वार्तांकन करत असलेल्या माध्यमांकडून त्यांच्यावरील आरोपांमुळे कुटुंबाचे आणि आश्रमांची बदनामी होत असल्याने वार्तांकनास बंदी घालावी अशी याचिका आसाराम बापूंनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
गर्भपातासाठी आसाराम बापूंचा पीडित महिलांवर दबाव