मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात भाजपतर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे, असे प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी सांगितले.

या अभियानानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून त्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे.  प्रत्येक विभागात दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व उपकरण यांचे वितरण करणे, प्रत्येक जिल्ह्यातील गरीब वस्ती, अनाथाश्रम, रुग्णालये व वृद्धाश्रमांना भेट देऊन फळांचे वाटप करणे,  जिल्हा/विभाग  स्तरावर आरोग्य तपासणी शिबीर, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप, रक्तदान शिबीर इत्यादी कार्यक्रम राबविले जातील.