नेपाळमधील प्रसिद्ध गढीमाई महोत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या २० वर्षीय भारतीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या सात  जणांना अटक करण्यात आली. पीडित तरुणी ही बिहारमधील मोतीहारी येथील राहणारी आहे. नेपाळच्या दक्षिणेकडील बारा जिल्ह्य़ातील धार्मिकस्थळी भेट देण्यासाठी तरुणी आली असता मंगळवारी दुपारी तिच्यावर सात जणांनी मिळून बलात्कार केला, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक रवींद्र रेगमी यांनी दिली. या घटनेनंतर पीडित तरुणी मंदिर परिसरात एकटीच फिरत होती. नागरिकांनी तिच्याबद्दल पोलिसात माहिती दिली. सध्या तिला महिला आणि बाल सेवा केंद्रात ठेवण्यात आले आहे.