24 September 2020

News Flash

सावधान! करोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायसरचा शिरकाव, सात जणांचा मृत्यू तर ६० जणांना संसर्ग

चीनमधील हुआन प्रांतातून फैलाव झालेल्या करोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे

(Photo: AP)

करोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातलेलं असून आधीच जगासमोर संकटांचा डोंगर उभा आहे. चीनमधील हुआन प्रांतातून फैलाव झालेल्या करोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. करोनावरील लस किंवा औषध मिळवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत असतानाच चीनमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये अजून एका संसर्गजन्य आजाराने (SFTS) शिरकाव केला असून आतापर्यंत या आजारामुळे सात जणांचा मृत्यू झाला असून ६० जणांना संसर्ग झाला आहे. ग्लोबल टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

हा आजार संसर्गजन्य असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची भीती आहे. चीनमध्ये सध्या अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्षाच्या सुरुवातीला जिआंगसू प्रांतातील ३७ लोकांना या आजाराचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर पूर्व चीनमधील अनहुई प्रांतातील २३ जणांनाही हा आजार झाल्याचं स्पष्ट झालं.

या आजाराची लागण झालेल्या जिआंगसू प्रांतातील महिलेमध्ये ताप आणि खोकला ही लक्षणं जाणवत होती. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली असता महिलेमध्ये पांढऱ्या रक्ताच्या पेशी कमी झाल्याचं लक्षात आलं. एक महिना उपचार केल्यानंतर महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या आजारामुळे आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

चीनसाठी हा SFTS व्हायरस तसा नवा नाही. २०११ मध्येच चीनला यासंबंधी माहिती मिळाली होती. पण करोना संकट असतानाच या आजाराची लागण होत असल्याने चीनची चिंता वाढू लागली आहे. विषाणूशास्त्रज्ञांनी हा आजार किटकांपासून फैलावत असल्याची शंका व्यक्त केली असून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो असं सांगितलं आहे. डॉक्टरांनी किड्यांनी चावा घेतल्याने हा संसर्ग होऊ शकतो असं सांगितलं असून योग्य काळजी घेतल्यास घाबरण्याची कोणतीही गरज नसल्याचं म्हटलं आहे. लोकांना घाबरुन जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 11:15 am

Web Title: seven dead and 60 infected by new infectious disease in china sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 भारतात एकाच दिवसात आढळले ५६,२८२ करोना रुग्ण, आतापर्यंत १२ लाखापेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त
2 कोविड रुग्णालय आग : पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी पुढे केला मदतीचा हात
3 Good News: ऑक्सफर्ड पाठोपाठ नोव्हाव्हॅक्सने सिरमसोबत केला लस पुरवठ्याचा करार
Just Now!
X