News Flash

कर्नाटक : रस्ते अपघातात गर्भवती महिलेसह ७ जणांचा मृत्यू

कलबुर्गी जिल्ह्यात घडला अपघात

संग्रहित छायाचित्र

रस्ते अपघातात कर्नाटकातील ७ जणांचा मृत्यू झालेला आहे. कलबुर्गी जिल्ह्यातील सावलगी गावाजवळ हा अपघात घडला. कार आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या स्टेशनरी ट्रकची धडक झाली…ज्यात कारमधील सातही जणांना जागीच आपले प्राण गमवावे लागले. या सात जणांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश होता.

इरफाना बेगम असं या गर्भवती महिलेचं नाव असल्याचं कळतंय. याव्यतिरीक्त रुबिया बेगम, आबेदा, जयचुन भाई, मुनीर, मोहम्मद अली आणि शौकत अली अशी अपघातात मृत्यूमुखी पावलेल्यांची नाव आहेत. या अपघाताप्रकरणी कलबुर्गी जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून हा अपघात नेमका कसा घडला याबाबत तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 7:14 pm

Web Title: seven including pregnant woman die in karnataka road accident psd 91
Next Stories
1 राष्ट्रपतींची तिन्ही कृषी विधेयकांवर मोहोर; झाले कायद्यात रुपांतर
2 ‘सिरम’चे अदर पूनावाला यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक, म्हणाले…
3 गुप्तेश्वर पांडे यांचा जदयूमध्ये पक्षप्रवेश, विधानसभा निवडणूक लढवणार
Just Now!
X