जम्मू-काश्मीरमधील पुलवामा व शोपियाँ जिल्ह््यात दोन चकमकींत सुरक्षा दलांनी सात दहशतवाद्यांना ठार केले असून त्यात अन्सार गझतुल हिंदचा प्रमुख इम्तियाझ अहमद शहा याचा समावेश आहे.

शोपियाँ येथील दहशतवादविरोधी मोहिमेत पाच दहशतवादी मारले गेले आहेत. तर पुलवामा जिल्ह््यात त्राल येथील चकमकीत नोबुग येथे इतर तीन दहशतवादी मारले गेले आहेत. काश्मीर विभागाच्या पोलिसांनी सांगितले की, शोपियाँ येथील मशिदीत लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना रात्रभरातून शरण येण्यास सांगण्यात आले होते. लपलेल्या दहशतवाद्याचा भाऊ व स्थानिक लोक त्याचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याशिवाय मशीद वाचवण्याचेही प्रयत्न करण्यात आले. पोलिसांनी आधी एका ट्विट संदेशात असे म्हटले आहे की, अन्सार गझवातुल हिंदचा प्रमुख मशिदीत लपून बसला होता. शोपियाँतील चकमकीस गुरुवारी रात्री सुरुवात झाली.  त्यानुसार त्यात तीन दहशतवादी ठार झाले असून सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. पुलवामा जिल्ह््यात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी दोन अज्ञात दहशतवाद्यांना ठार केले.