News Flash

‘ऑपरेशन डॉल्फिन नोज’, पाणबुडयांच्या लोकेशन्सची ISI ला माहिती देणाऱ्या सात नौसैनिकांना अटक

नौदलात रुजू झाल्यानंतर वर्षभरातने तीन ते चार महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरुन आंध्रप्रदेश पोलिसांनी शुक्रवारी नौदलाच्या सात नौसैनिकांना आणि मुंबईतील एका हवाला ऑपरेटरला अटक केली आहे. देशाच्या वेगवेगळया भागातून या आठजणांना अटक करुन विजयवाडा येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने ३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि भारतीय नौदलाच्या गुप्तचर विभागाच्या समन्वयातून ‘ऑपरेशन डॉल्फिन नोज’ राबवण्यात आले. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. विशाखापट्टणम, मुंबई आणि कारवार येथील नौदलाच्या तळावर तैनात असणारे हे नौसैनिक २०१८ च्या मध्यापासूनच भारतीय जहाजे आणि पाणबुडयांविषयी गोपनीय माहिती आयएसआयच्या एजंटसना देत होते.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हे रॅकेट जितके दिसतेय, त्यापेक्षा मोठे असू शकते. हवाला ऑपरेटरला याबद्दल अधिक माहिती असू शकतो. त्यामुळे याची सखोल चौकशी आवश्यक आहे असे आंध्र प्रदेश पोलिसांच्या गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले. आंध्र प्रदेश पोलिसांच्या गुप्तचर विभागाने केंद्रीय यंत्रणा आणि नौदलाच्या गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने मिळून हे ऑपरेशन केले.

२०१७ सालच्या सुरुवातीला हे नौसैनिक सेवेत रुजू झाले होते. नौदलात रुजू झाल्यानंतर वर्षभरातने तीन ते चार महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला व आपल्या जाळयात ओढले. या महिलांनी एका बिझनेसमॅन बरोबर त्यांची ओळख करुन दिली. तो आयएसआयचा एजंट होता. हा एजंट भारतीय नौदलाच्या युद्धनौका, पाणबुडया समुद्रात कुठल्या ठिकाणी उभ्या आहेत. त्यांचा प्रवासमार्ग कसा असेल याविषयी गोपनीय माहिती मिळवायचा. त्या बदल्यात या नौसैनिकांना हवाला ऑपरेटरमार्फत भरपूर पैसा मिळत होता. पोलीस अद्याप या कटाचे हँडलर आणि त्या महिलांपर्यंत पोहोचलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 2:51 pm

Web Title: seven navy sailors hawala operator held spying for pakistan dmp 82
Next Stories
1 शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन पाकिस्तानी सैनिक ठार
2 #CAA: तुझी दाढी खेचून काढू, पत्रकार ओमर राशिदचा पोलिसांच्या ताब्यात असतानाचा अनुभव
3 विसरू नका २००२ मध्ये काय झालं; कर्नाटकातील मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
Just Now!
X