28 September 2020

News Flash

हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये उतरलेल्या सात जणांचा मृत्यू

अग्निशमन दलाच्या जवानांनी सात जणांचे मृतदेह टँकबाहेर काढले

संग्रहित छायाचित्र

गुजरात येथील एका हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये उतरलेल्या सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अजय विसावा, विजय चौहान, सहदेव वसावा, अशोक हरिजन, महेश पतनवडिया, बृजेश हरिजन, महेश हरिजन हे सगळेजण सेप्टिक टँकमध्ये सफाई करण्यासाठी उतरले होते. त्यावेळी गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात आधी महेश पतनवडिया सेप्टिक टँकमध्ये उतरला होता. तो बराचवेळ परतला नाही त्यानंतर अशोक, बृजेश आणि महेश त्याला पाहण्यासाठी सेप्टिक टँकमध्ये उतरले. हे चौघेही बराचवेळ परत आले नाहीत त्यामुळे सहदेव, चौधरी आणि अजय हे त्यांना शोधण्यासाठी आतमध्ये उतरले. ज्यानंतर हे तिघेही बेशुद्ध झाले. टँक स्वच्छ करण्यासाठी गेलेले सातजण बाहेर आले नाहीत तेव्हा दाभोई नगर पालिका आणि स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आली. ज्यानंतर अग्निशमन दलाकडे मदत मागितली गेली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सातही जणांचे मृतदेह बाहेर काढले. या सातही जणांचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला. टँकमध्ये गॅसचे प्रेशर मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे या सातही जणांचा मृत्यू झाला असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बडोदा येथील फर्टीकुई गावात असलेल्या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेतलं आहे.पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2019 1:58 pm

Web Title: seven people including four sanitation workers cleaning a hotels septic tank have died allegedly of suffocation in fartikui village in vadodara scj 81
Next Stories
1 आंदोलनातही माणुसकी! डॉक्टरांनी केली महिलेची प्रसुती
2 विनायक राऊत यांची लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी निवड
3 बहिणीच्या लग्नाला सुट्टी नाकारली, डॉक्टरची आत्महत्या
Just Now!
X