News Flash

माओवाद्यांच्या हल्ल्यात सात पोलीस शहीद

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये सात पोलीस शहीद झाले आहेत.

| December 3, 2013 07:50 am

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये सात पोलीस शहीद झाले आहेत.
पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, आज(मंगळवार) दुपारी चार वाजता पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार यांच्यासह इतर पाच पोलीस गस्तीसाठी आपल्या पोलीस गाडीतून बाहेर पडले असताना माओवाद्यांनी रस्त्यामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला यात एकूण सहा पोलीस आणि चालक यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळावर पोलिसांनी ताबा घेतला असून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 7:50 am

Web Title: seven policemen killed in maoist attack in aurangabad
टॅग : Maoist Attack
Next Stories
1 ‘मोदी भाषणच करत राहतील अन् राहुल गांधी पंतप्रधान होतील’
2 ‘..तर २६/११ पुन्हा घडेल’
3 ए. के. गांगुली यांचा ‘डब्ल्यूबीएचआरसी’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार नाही
Just Now!
X