News Flash

आईला वाचवण्यासाठी भांडणात पडणाऱ्या सात वर्षाच्या मुलीची बापाकडून हत्या

धक्कादायक म्हणजे मुलीच्या आईने हत्येची ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला

प्रतिनिधिक छायाचित्र

आपल्या आईला वाचवण्यासाठी भांडणात पडणाऱ्या सात वर्षांच्या मुलीची तिच्याच वडिलांकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पुर्णपणे दारुच्या आहारी गेला असून, त्यादिवशीदेखील मद्यपान करुन आपल्या पत्नीला मारहाण करत होता. आईला वडिलांकडून मारहाण होताना पाहून मुलगी वाचवण्यासाठी गेली. मात्र आरोपीने मुलीला इतकी मारहाण केली की तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी याप्रकरणी ३७ वर्षीय कैलाश याला अटक केली आहे. तामिळनाडूमधील तिरुनेवेली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, मुलीच्या आईने हत्येची ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही मुलीची आई निलावती हिलाही अटक केली आहे.

सोमवारी रात्री ही घटना घडली. पण शेजाऱ्यांना शंका आली आणि मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरीत शिकणारी सुगीरथा घराबाहेर खेळत होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला घरी बोलावून घेतलं होतं. मात्र तिने दुर्लक्ष केलं आणि पुन्हा खेळू लागली.

सोमवारी रात्री जेव्हा आरोपी कैलाश घरी परतला तेव्हा मुलीच्या वागण्यावरुन पत्नीशी भांडू लागला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. सुगीरथाने वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याचा पारा अजून चढला आणि त्याने सुगीरथाला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण झाल्याने सुगीरथा बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात नेलं असता मृत घोषित करण्यात आलं.

दांपत्याने मृतदेह घरी नेला आणि ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला. मुलगी छतावरुन पडल्याने जखमी झाली होती असा दावा त्यांनी केला. मंगळवारी त्यांनी अंत्यविधी करण्याची सगळी तयारी केली होती. मात्र संशय निर्माण झाल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. चौकशी केली असता सत्य समोर आलं आणि पोलिसांनी दांपत्याला अटक केली. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 12:53 pm

Web Title: seven year old girl beaten to death by father in tamilnadu sgy 87
Next Stories
1 विलासरावांचे सरकार तारणारे शिवकुमार कर्नाटकचे सरकार वाचवणार का?
2 भाजपा आमदाराचा हातात दारु आणि बंदुका घेऊन डान्स, व्हिडीओ व्हायरल
3 गोवा सरकार लग्नापूर्वी HIV चाचणी बंधनकारक करण्याच्या विचारात
Just Now!
X