News Flash

अघोरी कृत्य! सात वर्षाच्या मुलीची हत्या करुन यकृत बाहेर काढलं, बलात्काराचाही प्रयत्न

पोलिसांकडून चारही आरोपींना अटक

प्रातिनिधिक

उत्तर प्रदेशात सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला असून यकृत बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीवर बलात्कार झाल्याचाही संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलाच्या हव्यासापोटी गावातील एका दांपत्याने मुलीच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी त्यांनी मुलीच्या शेजारी राहणाऱ्या दोघांना एक हजार रुपये दिले होते.

शनिवारी रात्री दोघांनी मुलीचं अपहरण केलं. दारुच्या नशेत असणाऱ्या दोघांनीही मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर त्यांनी यकृत बाहेर काढलं आणि विधी करण्यासाठी दांपत्याकडे सोपवलं असंही पोलिसांनी सांगितलं आहे. रविवारी सकाळी मुलीचा मृतदेह गावात सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शरिरातील इतर अवयवही बाहेर काढण्यात आले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सर्व चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

“प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या होत्या. संशयाच्या आधारे मुलीचे शेजारी अंकुल आणि बीरन यांना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्यांनी कबुली दिली. अंकुरचे काका परशुराम यांनी आम्हाला पैसे दिले होते अशी माहिती त्यांनी दिली,” असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, “दोन्ही आरोपींनी मुलीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिचं यकृत बाहेर काढलं आणि परशुराम यांच्याकडे नेऊन सोपवलं”. परशुरामचं १९९९ मध्ये लग्न झालं असून मूल नसल्याने त्याला नैराश्य आलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय पीडितेच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 9:46 am

Web Title: seven year old girl killed in kanpur liver extracted for couples occult ritual sgy 87
Next Stories
1 … अन् त्या भीतीमुळे ट्रम्प यांनी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला मागे
2 भाऊ सातव्यांदा CM झाल्यानंतरही नितीश यांची बहीण नाराज, म्हणाली, “आता भावाने पंतप्रधान व्हावं”
3 दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
Just Now!
X