News Flash

मोदी सरकारने पूर्ण केले सात वर्ष; अमित शाहांचं ट्विट, म्हणतात…

seven years of modi government 2.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमित शाह यांनी केलं ट्विट... सरकारच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमित शाह यांनी केलं ट्विट... (संग्रहित छायाचित्र। पीटीआय)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्रात सत्तेत दुसऱ्यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत असून, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देखील ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांना उजाळा दिला असून, सरकारच्या एकूण कामगिरीबद्दल मत व्यक्त केलं आहे. “मागील सात वर्षात देशातील जनतेनं पंतप्रधान मोदी यांच्या सेवा आणि सर्मपणावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी देशवासियांना नमन करतो. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून भारताच्या विकासाचा गाडा अखंडितपणे पुढे घेऊन जाऊ, याचा मला पूर्ण विश्वास आहे,” असं शाह यांनी म्हटलं आहे.

मोदी २.० सरकार सर्वेक्षण : हो, मोदी सरकारने करोनापेक्षा निवडणुकांना दिलं अधिक महत्त्व

“या सात वर्षांमध्ये मोदीजींनी देशहिताला सर्वोच्च मानून दृढनिश्चय आणि सर्वांसाठी आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी आणि वंचित वर्गांना विकासाच्या मुख्य धारेशी जोडलं. त्यांचं जीवनमान उंचावलं. त्याचबरोबर आपल्या सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले,” असं शाह यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

मोदी 2.0 सरकार सर्वेक्षण : अबकी बार गडकरी… पंतप्रधान म्हणून महाराष्ट्राच्या मनात गडकरीच

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. “सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन आणि एनडीए परिवाराला शुभेच्छा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आजचा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. भाजपाचे कोट्यवधी कार्यकर्ते आज एक लाख गावांमध्ये आपली सेवा देणार आहे,” असं नड्डा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 2:57 pm

Web Title: seven years of modi government modi government 2 0 amit shah tweets bmh 90
Next Stories
1 Corona: हरयाणात ७ जूनपर्यंत लॉकडाउन असणार; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची माहिती
2 मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरु?; भारतीय विमान डोमिनिकात दाखल
3 ब्रिटनच्या पंतप्रधानांनी गुपचूप उरकलं लग्न !; २३ वर्षे लहान असलेल्या प्रेयसीसोबत थाटला संसार
Just Now!
X