पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने आणखी एका संशयिताला अटक केली आहे. मोहन नायक असे या संशयिताचे नाव आहे. कर्नाटकच्या दक्षिण कन्नडमधून त्याला अटक करण्यात आली आहे. १८ जुलैला मोहन नायकला अटक करण्यात आली. या प्रकरणातला हा सातवा संशयित आहे अशीही माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या हत्येतील मुख्य आरोपी परशुराम वाघमारे ला विजयपूर जिल्ह्यातून जून महिन्यात अटक करण्यात आली. त्याआधी के. टी नवीन कुमार, मनोहर एडवे, अमोल काळे, सुजीत कुमार उर्फ प्रवीण आणि अमित डेगवेकर अशा ५ जणांना अटक करण्यात आली आहे. मागील वर्षी ५ सप्टेंबरला गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली.
आता या प्रकरणात सातवी अटक करण्यात आली. हल्लेखोराने हेल्मेट घालून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या चालवल्या होत्या. गौरी लंकेश यांनी भाजपा विरोधात लिखाण केले होते

गौरी लंकेश या साप्ताहिक ‘लंकेश पत्रिका’च्या संपादिका होत्या. विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करायच्या. वृत्त वाहिन्यावर प्राइम टाइममध्ये होणाऱ्या विविध चर्चेच्या कार्यक्रमांत त्यांच्या सहभाग असायचा. त्या देशातील असहिष्णुता आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादाच्या प्रखर विरोधक होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seventh suspect arrested in gauri lankesh killing probe team
First published on: 20-07-2018 at 19:22 IST