News Flash

मुख्यमंत्र्यांच्या VIP दर्शनादरम्यान उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; अनेकजण जखमी

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि बऱ्याच अति महत्त्वाच्या व्यक्ती मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या होत्या.

Several injured in stampede situation at mahakaleshwar temple in Ujjain
सोमवारी ५,००० लोकांना मंदिरात जाण्यास पूर्वीच परवानगी देण्यात आली होती

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे सोमवारी अनेक महिला व मुले जखमी झाली. मंदिराच्या उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अति महत्त्वाच्या लोकांसह मंदिरात गर्दी झाली होती, यामुळे परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि बऱ्याच अति महत्त्वाच्या व्यक्ती मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या होत्या.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मंदिराच्या गेट नंबर ४ वरून भाविकांनी सुरक्षा घेराव तोडला आणि एकमेकांना ढकलून आत प्रवेश करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. ही दुर्घटना टळली आणि कोणाच मृत्यू झाला नाही अशी माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

बॅरीकेड पडताच मंदिरात जाणाऱ्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. करोना संसर्गाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात महाकाळ मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा दंडाधिकारी आशिष सिंह म्हणाले की, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महाकाल मंदिरातील गेट नंबर चार येथे ही घटना घडली.

त्यांनी पुढे सांगितले की भगवान महाकालच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी जमली होती. तेथे अचानक आलेल्या जमावाने बॅरीकेड फेकले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि लोक मंदिरात जाऊ लागले. या घटनेत कोणालाही इजा किंवा जखमी झाले नाही, असे सिंग यांनी सांगितले. लवकरच सुरक्षा कर्मचार्‍यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

महाकाल मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा दंडाधिकारी आशिष सिंह म्हणाले की, सोमवारी ५,००० लोकांना मंदिरात जाण्यास पूर्वीच परवानगी देण्यात आली होती. परंतु श्रावनाच्या पहिल्या सोमवार असल्यामुळे सुमारे ५०-६० हजार भाविक देशभरातून आले होते, ज्यांच्यासाठी दर्शनाची व्यवस्था सुरू केली गेली. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुमारे १७५ कि.मी. अंतरावर उज्जैन येथे महाकालेश्वर मंदिर आहे. भगवान शंकराच्या देशात असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2021 10:39 am

Web Title: several injured in stampede situation at mahakaleshwar temple in ujjain abn 97
Next Stories
1 मोठी दुर्घटना! आफ्रिकन स्थलांतरितांची बोट समुद्रात बुडाली; ५७ जणांचा मृत्यू
2 करोनाचा वेग मंदावतोय?; चार महिन्यानंतर पहिल्यांदाच सापडले इतके कमी करोनारुग्ण
3 आसाम-मिझोराम सीमासंघर्षात महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी जखमी; वैभव निंबाळकरांना गंभीर दुखापत
Just Now!
X