आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना, अमेरिकेच्या हवाईदलाच्या तळावर पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. साधारण चार क्षेपणास्त्रे डागण्यात आल्यानंतर घडलेल्या विस्फोटात इराकी हवाई दलाचे दोन अधिकारी आणि दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री उशीरा ही माहिती समोर आली आहे. बगदादपासून साधारण ७० किलोमीटर उत्तरेस स्थित असलेल्या अल-बलाद हवाईतळावर कत्युशा श्रेणीचे आठ रॉकेट सोडण्यात आले होते.
Four rockets hit Iraq airbase hosting US troops, reports AFP News Agency quoting Military sources
— ANI (@ANI) January 12, 2020
अल-बलाद हवाईतळ हे इरकामध्ये अमेरिकी हवाईदलाचे प्रमुख तळ मानले जाते. इराक आपल्या ‘एफ-१६’ या लढाऊ विमानांना देखील या ठिकाणीच ठेवतो. या हल्ल्यात अमेरिकी सैन्याला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
मागील दोन आठवड्यांपासून इराण बरोबर तणाव वाढल्यापासून या ठिकाणाहून बहुतांश अमेरिकी सैन्य काढण्यात आलेले आहे. हल्ला करणारे क्षेपणास्त्र नेमके आले कुठून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इराणने आपले सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानीच्या हत्येनंतर मागील आठवड्यात याच सैन्य तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता.
अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाईहल्ला करून इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानीला ठार मारल्यापासून आखातात तणाव निर्माण झालेला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2020 8:08 am