उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे पोलिसांनी एक सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी एके ठिकाणी छापा टाकून ही अटकेची कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण वेश्या व्यवसाय करणाऱ्यांची टोळीतील सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी चार जण हे पश्चिम बंगालचे असून इतर दोघे उत्तर प्रदेशचे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उधम सिंह नगरमधील रुद्रपूरमध्ये एका भाड्याच्या घरामध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं. धक्कादायक बाब म्हणजे चालत्या गाड्यांमध्ये हे सेक्स रॅकेट चालवण्यात यायचं. एका फोन कॉलवर ग्राहकांना वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली पुरवल्या जायच्या, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. आटवड्यातून दोन ते तीनवेळा आरोपी गाडीमधून हल्द्वानी येथे जायचे. वाटेमध्ये काही ठरलेल्या ठिकाणी गाडी थांबवली जायची. याच काळामध्ये एखाद्या ग्राहकाचा फोन आल्यास त्याला तिथेच या मुलींचा ताबा दिला जायचा, असंही आरोपींनी म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या खबऱ्यांनी टीपी नगर परिसरामध्ये एका गाडीमध्ये काही मुलं आणि मुली संशयास्पद पद्धतीने फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आपल्या मानवीतस्करी विरोधी पथकाला ही माहिती दिली. त्यानंतर या पथकाच्या प्रमुख लता बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी इनोव्हा कारमध्ये सहा लोकं बसल्याचं आठळून आलं. यामध्ये चार तरुण मुलींचाही समावेश होता. पोलिसांनी या सर्वांची चौकशी केली असता सेक्स रॅकेटसंदर्भात धक्कादायक खुलासा या लोकांनी केली. पोलिसांनी या सर्वजणांकडून ११ मोबाइल फोन आणि बऱ्याच आक्षेपार्ह गोष्टी जप्त केल्या आहेत. पोलिसांना घटनास्थळावरुन तसेच दिलेल्या कबुली जबाबावरुन पुरावे मिळाल्यानंतर या सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी आयपीसी कलम २९४/३४ आणि ५/७ बेकायदेशीर व्यापार अधिनियम १९५६ अंतर्गत या सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
आणखी वाचा- पत्नी सोडून गेल्याने १८ महिलांची हत्या; हैदराबादमध्ये सीरिअल किलरमुळे खळबळ
तपासादरम्यान मानवी तस्करी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार या टोळीतील चार मुलींना ग्राहक मिळवून देण्याचं काम दोन मुलं करायची. या मोबदल्यात ते दलाली म्हणून मुलींकडून पैसे घ्यायचे आणि त्यांना ग्राहकांपर्यंत पोहचलवण्याचं काम करायचे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2021 9:14 am