05 June 2020

News Flash

संघात मुलाच्या निवडीसाठी ‘डीडीसीए’च्या पदाधिकाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी – केजरीवालांचा आरोप

संबंधित महिला एका ज्येष्ठ पत्रकाराची पत्नी असल्याचा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी मुलाखतीदरम्यान केला.

किमान ४ आमदारांची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. या आमदारांनी काँग्रेसमध्ये सहभागी होण्यावरून ही बैठक घेतली होती. या आमदारांनी आणखी ३१ आमदारांच्या पाठिब्यांचेही आश्वासन दिले आहे.

दिल्लीच्या क्रिकेट संघात मुलाची निवड करण्याच्या मोबदल्यात दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) पदाधिकाऱ्याकडून एका महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तुमच्या मुलाची दिल्लीच्या संघात निवड करायची असेल तर रात्री माझ्याकडे या असा प्रस्ताव डीडीसीएच्या पदाधिकाऱ्याने एका महिलेसमोर ठेवला होता, असे केजरीवाल यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले. केजरीवालांनी या पदाधिकाऱ्याचे नाव सांगण्यास नकार दिला असला तरी संबंधित महिला एका ज्येष्ठ पत्रकाराची पत्नी असल्याचा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी मुलाखतीदरम्यान केला. साधारण महिनाभरापूर्वी डीडीसीएच्या पदाधिकाऱ्याने या महिलेला स्वत:च्या घरी येण्यास सांगितले होते.
या पत्रकाराचा मुलगा क्रिकेट खेळतो. त्यानेच मला सांगितले होते की, त्याच्या मुलाला दिल्लीच्या संघात निवड झाल्याचा कॉल आला होता. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा निवड झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली तेव्हा त्या यादीत त्याचे नाव नव्हते. दुसऱ्याच दिवशी त्या पत्रकाराच्या पत्नीला संबंधित पदाधिकाऱ्याने रात्री माझ्या घरी ये, तुझ्या मुलाची निवड होईल, असा मेसेज पाठवल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2015 6:17 pm

Web Title: sexual favor sought by ddca official for selection in cricket team arvind kejriwal
Next Stories
1 राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राची ३०५० कोटींची मदत
2 आयएसआयसाठी काम करणाऱ्या भारतीय हवाईदलाच्या अधिकाऱ्याला अटक
3 दलितांचे सक्षमीकरण करणारे सरकार- नरेंद्र मोदी
Just Now!
X