News Flash

नीरा राडियांच्या कंपन्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू

कंपनी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल माजी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांच्या मालकीच्या वैष्णवी समूह कंपन्यांवर कारवाई करण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे ‘सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिस’ने (एसएफआयओ)

| March 27, 2014 06:09 am

कंपनी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल माजी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांच्या मालकीच्या वैष्णवी समूह कंपन्यांवर कारवाई करण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे ‘सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिस’ने (एसएफआयओ) सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
कंपनी व्यवहार मंत्रालयाने वैष्णवी समूहाच्या कंपन्यांवर कारवाई करण्यास अनुमती दिली असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे ‘एसएफआयओ’ने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
वैष्णवी समूहाच्या कंपन्यांनी कंपनी कायद्यातील कोणत्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे, त्याचा तपशीलही प्रतिज्ञापत्रात देण्यात आला आहे. वैष्णवी समूह आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या अन्य आठ कंपन्यांची चौकशी पूर्ण झाली असून अंतिम तपास अहवाल २२ जानेवारी रोजी मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे, असेही ‘एसएफआयओ’ने म्हटले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 6:09 am

Web Title: sfio to prosecute niira radia companies
Next Stories
1 रशियाने हवाई क्षेत्र बंद केल्याने फ्रान्सचे विमान वळवले
2 पाकिस्तानची मदत एक कोटी डॉलरने कमी करून अमेरिका युक्रेनला देणार
3 अंतराळवीरांना स्थानकात पोहोचण्यास विलंब होणार
Just Now!
X